सावंतवाडीत ठिकठिकाणी ठेवली पाण्याची भांडी; उपस्थितांकडुन उपक्रमाचे कौतुक…
सावंतवाडी
मिशन आधार सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून पक्षी व प्राण्यांना कडक उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी, यासाठी आज हा उपक्रम सावंतवाडीत राबविण्यात आला. यावेळी शहरातील तसेच परिसरातील अनेक भागात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली. कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या हस्ते हे अभियान राबविण्यात आले. यावेळी मळगाव घाटी, शिल्पग्राम रोड, सावंतवाडी मच्छीमार्केट, पाटबंधारे कार्यालय, चराठा कॉलनी आदी ठिकाणी पाण्याची भांडी ठेवण्यात आली. यावेळी जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष परिमल नाईक, माजी शिक्षक श्री. नाडकर्णी सर, सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी गजानन परब, पाटबंधारे विभाग कर्मचारी संदीप राणे तसेच मिशन आधार चे उपाध्यक्ष आनंद पुनाळेकर, प्रसाद नाडकर्णी, वैभव घाग, ऋषिकेश खानोलकर, वामन सावंत, तुषार रेमुळकर, ओमकार शिरोडकर, सोनाप्पा गवळी आदी उपस्थित होते.