You are currently viewing भाजपाची देवगडात राज्य मार्ग परिवहन मंडळावर धडक

भाजपाची देवगडात राज्य मार्ग परिवहन मंडळावर धडक

वाहतूक सेवा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा

देवगड :

लॉक डाऊनच्या काळात सर्वत्र बंद असताना आता महाराष्ट्र मध्ये ती प्रक्रिया सुरू झाली आहे. गेले आठ महिने लॉक डाऊन मुळे त्रस्त झालेली जनता व्यवसायासाठी बाहेर पडत आहे.
तसेच शाळा, महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची लगबग वाढत आहे. देवगड तालुक्यातील नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांचे प्रचंड गैरसोय होताना दिसत आहे.
देवगड परिवहन मंडळाकडून गाड्या वेळेत येत नसल्याने किंवा गाड्या गावागावात जात नसल्याने नागरिकांचे तसेच विद्यार्थ्यांचे प्रचंड गैरसोय होताना दिसत आहे. सध्या देवगड आगारातील सुमारे चाळीस चालक-वाहकांना मुंबई ठाणे येथे सेवेसाठी पाठवल्यामुळे देवगड आगारातील एसटी फेऱ्यांवर
विपरित परिणाम होत आहे. याचा फटका येथील नागरिक तसेच विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.
या सर्व गोष्टींचा आगार प्रमुख यांनी विचार करून चालक-वाहकांना देवगड आगारात हजर करून वाहतूक सेवा सुरळीत करून द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी देवगड तर्फे करण्यात आली आहे नाहीतर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा