विविध धार्मिक/ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
सिंधुदुर्ग
गावराई सुकळवाड साई मंदिर येथे १४ वा वर्धापन दिन सोहळा २८ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ एप्रिल ते २८ एप्रिल साई सूचरित्र पोथी वाचन पारायण व शुक्रवार २८ एप्रिल सकाळी ७ वाजता साई सूचरित्र पारायण वाचन आरती सकाळी ८ वाजता अभिषेक दुपारी १२.३० वाजता आरती दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजता साई मंदिर ते महापुरुष हनुमान मंदिर सुकळवाड ब्राह्मण देव मंदिर येथून सवाघ साई पालखी भव्य दिव्य मिरवणूक देखावे सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव व महाआरती सायंकाळी ७.३० वाजता खुल्या रेकॉर्ड डान्स रात्रौ ११ वाजता महिलांसाठी बहारदार कार्यक्रम खेळ पैठणीचा सूत्रसंचालन समीर चऱ्हाटकर शनिवार २९ एप्रिल सकाळी ९ ते १२ नवग्रह शांती होमहवन दुपारी १२ वाजता आरती दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजता नामस्मरण सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव व महाआरती रात्रौ ८ वाजता दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा ट्रिक्ससिन नाट्यप्रयोग स्वामी ब्रम्हांडनायक रविवार ३० एप्रिल सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी १२.३० वाजता आरती दुपारी १ते ३ महाप्रसाद दुपारी २ ते ४ वाजता हळदीकुंकू दुपारी ४ ते सायंकाळी ६ नामस्मरण सायंकाळी ७ वाजता दिपोत्सव व महाआरती सायंकाळी ७:३० वाजता ते रात्रौ ८ साई दिंडी रात्रौ ८ ते १२.३० वाजता मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ मोरे यांचा पौराणिक नाट्य प्रयोग अकल्पासूर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ओम साई सेवा समिती गावराई सुकळवाड यांनी केले आहे.