You are currently viewing कणकवली – सावडाव एसटीचा जानवली तरंदळे येथे अपघात…

कणकवली – सावडाव एसटीचा जानवली तरंदळे येथे अपघात…

कणकवली

कणकवलीहुन सावडावला जाणारी कणकवली सावडाव एसटी जानवली तरंदळे फाट्यावरील बॉक्सेल ब्रिज च्या कडेला लावलेल्या स्ट्रीटलाईटच्या पोल ला खिडक्यांच्या भागातून घासून जात अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मात्र सर्विस रस्त्यावर पार्किंग करून ठेवलेल्या वाहनाला बाजू देत असताना एसटी चालकाकडून हा अपघात घडल्याचे समजते. सर्विस रस्त्यावर वाहने पार्किंग करून ठेवत असलेल्या बाबीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. आज दुपारी जानवली पुला नजीक असलेल्या तरंदळे फाट्याला जोडणाऱ्या सर्विस रोड येथून सावडाव च्या दिशेने जाणारी एसटी चा अपघात झाला. प्रवासी खिडक्यां चा भाग अक्षरशा पत्र्यासहित कापून निघाल्या. मात्र सुदैवाने या एसटीतून प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या अपघातात एसटीचे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा