*मुंबई-गोवा हा प्रवास आता अधिक वेगवान होणार*
*मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मुंबई-गोवा हा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा प्रवास अधिक गतीमान होणार आहे.
ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईतील महतप्रकल्प आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना हा मार्ग जोडतो. त्याचा बहुतांश लाभ मुंबईकरांना होणार असला तरी या मार्गामुळे मुंबई-गोवा वाहतूकही सुसाट होणार आहे.
हा सागरी सेतू पूर्वेकडील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला पश्चिमेकडील सागरी मार्गाशी जोडतो. त्यामुळे मुंबईकरांना गोव्यात जाणे सोपे होणार आहे. सध्या मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागतो.
मात्र या सागरी मार्गामुळे २५ मिनिटात मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते गोवा प्रवासातही दोन तास वाचणार आहेत.