दोघांचे मृतदेह सापडले
गोवा :
सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरु झाला असून गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर अनेक पर्यटक समुद्राचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. मात्र समुद्राचा अंदाज न आल्यास पाण्यात बुडण्याच्या घटनाही घडतात. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आलीय.
गोव्यातील केरी समुद्रात म्हापसा – कळंगुट येथील 4 मुली बुडाल्याची बातमी हाती येतेय. घटनास्थळी शोध कार्य चालू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुली समुद्रात बुडू लागल्याचे समजताच पालकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
एकाच कुटुंबातील ह्या मुली असून त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे. त्यांच्यासोबत कोण होते याबाबत अद्याप माहिती समोर आली नाहीय.