आ. नितेश राणे यांची भेट घेणार; सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी
फोंडाघाट
फोंडाघाट बाजारपेठ रस्ता रुंदीकरण या प्रश्नावर सार्वजानिक बांधकाम विभागानेच तोडगा काढायला हवा, याबाबत आमदार नितेश राणे यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी संवाद मिडियाशी बोलताना सांगितले.
फोंडाघाट बाजारपेठेतील वाहतुकीची कोंडी यावर बाजार पेठेतील रस्ता रुंदीकरण असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. रस्ता रुंदीकरण करायचा झाल्यास अतिक्रमणाचा विषय फोंडाघाट वासीयांना डोईजड होतोय, सार्वजनीक बांधकाम विभाग या विषयावर ग्रामपंचायतीला जबाबदार धरत आहे. सार्वजनीक बांधकाम विभागानेच यावर मार्ग काढावा असे फोंडाघाटवासियांचे म्हणणे आहे. याबाबत आपण आमदार नितेश राणे यांची भेट घेणार असल्याचे अजित नाडकर्णी म्हणाले.