You are currently viewing शिरोडा बायपास येथे मनसे पक्षाच्या कायमस्वरूपी फलकाचे आज अनावरण

शिरोडा बायपास येथे मनसे पक्षाच्या कायमस्वरूपी फलकाचे आज अनावरण

वेंगुर्ला माजी तालुका अध्यक्ष सनी बागकर यांचे उपस्थित रहाण्याचे आवाहन

वेंगुर्ला

मा.राजसाहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तर्फे आज शनिवार दि. २२एप्रिल २०२३ रोजी शिरोडा बायपास येथे पक्षाच्या कायमस्वरूपी फलकाचे अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस श्री. संदीप दळवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम दुपारी ४.०० वाजता पार पाडण्यात येईल. तसेच अनावरण झाल्या नंतर, ६ मे रोजी होणाऱ्या राज ठाकरे साहेबांच्या सभे निमित्ताने नियोजन करण्यात येईल. सदर नियोजनची सभा ४.१५ मिनीटांनी डोना डवली (ताराई) हॉटेल शिरोडा बायपास रोड येथे होईल. तरी सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वेंगुर्ला माजी तालुका अध्यक्ष सनी बागकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा