You are currently viewing शोषण मुक्त भारत” हे स्वप्न साकार करण्यासाठी ग्राहक पंचायतीची सभा

शोषण मुक्त भारत” हे स्वप्न साकार करण्यासाठी ग्राहक पंचायतीची सभा

*”शोषण मुक्त भारत” हे स्वप्न साकार करण्यासाठी ग्राहक पंचायतीची सभा*

*कळसुळकर ज्यू.कॉलेजमध्ये २४ एप्रिल रोजी आयोजन*

नमस्कार! १९७४ साली अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय स्तरावर नोंदणीकृत संस्थेच्या स्थापनेनंतर आज देशभरात बहुतांश राज्यात वस्तू आणि सेवा संदर्भात हाताळल्या जाणाऱ्या अनिष्ट प्रथा, , अनुचित प्रकार, नफेबाजी प्रवृत्ती,काळा बाजार, कृत्रिम टंचाई, वजन-मापे परिमाणात खोट, भेसळ , अन्यायकारक वर्तणूक, फसव्या जाहिराती इ.द्वारे अनेक स्तरांवर कार्यरत असलेले अनेक व्यापारी, उद्योजक, उत्पादक, बिल्डर्स, शासकीय विभागांतील काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कडून सर्व सामान्य नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ग्राहक या नात्याने करीत असलेल्या
फसवणूक, पिळवणूक, अन्याय आणि त्या नुसार आर्थिक शोषण याला आळा घालण्यासाठी संघटित होऊन काम करणे महत्त्वाचे आहे . या संदर्भात ग्राहकांच्या संरक्षणासाठी संघटनेचे सजग, अभ्यासू , तज्ञ पदाधिकारी आणि कार्यकर्ते देशातील विविध राज्यांतून झपाटून कार्य करीत आहेत. १९८६ सालापासून अमलात आलेला आणि आवश्यकतेनुसार सुधारित केलेला “ग्राहक संरक्षण कायदा ” हे संघटनेचे फलित आहे. लोकजागृतीचा एक भाग म्हणून ग्राहकांच्या संरक्षणासाठी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी अखिल भारतीय ग्राहक संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि कोकण प्रांताचे पदाधिकारी सोमवार दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथे आयोजित बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सावंतवाडी तालुका आणि जिल्हा स्तरावर नवीन कार्यकारिणीची उभारणी आणि सक्रिय कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावयाची आहे. आपल्या सारख्या अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी बाळगणारे सजग कार्यकर्त्यांच्या बळावरच संघटनेची वाटचाल सुकर होऊ शकते याचा सार्थ विश्वास मला आहे . “शोषण मुक्त भारत!” हे स्वप्न आपल्याला साध्य करण्यासाठी संघटित होऊन कार्य करावयाचे आहे . तेव्हा आपले व समविचारी मित्रांचे सहकार्य, सहभाग, सहयोग नितांत गरजेचा असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे ! धन्यवाद ! –
प्रा. सुभाष गोकुळदास गोवेकर
सह सचिव, कोकण प्रांत, अखिल भारतीय ग्राहक पंचायत . सावंतवाडी

 

संवाद मिडिया*

☕☕☕☕☕☕☕☕☕

*_आता नवीन जागेत नवीन तजेल्यासह…._*

*_☕सलगर चहाची चव आता चाखता येणार आमच्या नवीन जागेत…._☕*

*_🫖 सलगर अमृततुल्य चहा_*🫖
*सावंतवाडी*

*_🏬सावंतवाडी चिटणीस नाका येथे नव्या दालनात ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी पुन्हा हजर…!☕_*

*_चहाला वेळ नसते…! पण वेळेला चहा हा हवाच…!_*☕

*_चहाबरोबरच आम्ही घेऊन आलो आहोत उन्हाळ्यातल्या गारव्यासाठी…_*🧊🧊

*🥛मसाला ताक*

*🍋लिंबू सरबत*

*_आता सलगर चहा बरोबरच गारेगार मसाला ताक व लिंबू सरबत……_*

*_त्यासाठी आमच्या नव्या दालनात एकदा अवश्य भेट🏃‍♂️ द्या…_!*

*🎴आमचा पत्ता:-*

*_बस स्थानक रोड, रेणुका हॉटेल समोर, चिटणीस नाका, सावंतवाडी_*

*📲संपर्क:- ९४२३८७८७४०*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा