You are currently viewing भिरवंडे येथील रोहन सावंत पायलट सेवेत दाखल, तर पल्लवी सावंत एमबीए मध्ये अव्वल

भिरवंडे येथील रोहन सावंत पायलट सेवेत दाखल, तर पल्लवी सावंत एमबीए मध्ये अव्वल

कणकवली

भिरवंडे गावातील कॅप्टन रोहन सावंत हा पायलट सेवेत दाखल झाला आहे. भिरवंडे गावातील डॉक्टर शंकर सावंत यांचा चिरंजीव रोहन यांने व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण पूर्ण करून आता पायलट सेवेत रुजू झाला आहे. तर त्याची बहीण पल्लवी हिने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

भिरवेड गावातील डॉ. शंकर सावंत आणि त्यांची पत्नी डॉक्टर उमा तसेच डॉ. शिवाजी सावंत हे मुंबई येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. वैद्यकीय व्यवसाय करत असताना गावातील शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात सहभागी असणाऱ्या या कुटुंबातील कॅप्टन रोहन सावंत यांने विमान चालकाचे खडतर प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. त्यानंतर तो एका खाजगी संस्थेमध्ये वैमानिक म्हणून दाखलही झाला आहे.

रोहन यांनी मुंबई विद्यापीठाचे वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. पार्ले टिळक मध्ये प्राथमिक शिक्षणानंतर रोहनने पायलट होण्याची इच्छा प्रगट केली होती. त्यानुसार विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर खडतर असे वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तर त्याची बहीन पल्लवी हीने बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने ही पार्ले टिळक विद्यालय मुंबई येथून प्राथमिक शिक्षण घेतले होते. रोहन आणि पल्लवी या दोघांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा