You are currently viewing कणकवली नगरपंचायतीला मिळालेला बहुमान कणकवली वासियांमुळेच – नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली नगरपंचायतीला मिळालेला बहुमान कणकवली वासियांमुळेच – नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली

कणकवली नगरपंचायत ला कर वसुली सह अन्य विविध कामांमध्ये मिळालेल्या बहुमान हा कणकवली शहरवासीयांमुळेच मिळाला असून, हा बहुमान कणकवली शहरवासीयांना समर्पित करत असल्याची घोषणा कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या सह सत्ताधारी नगरसेवकानीं केली. कणकवलीकरांच्या पाठिब्यामुळेच नगरपंचायत ला हा बहुमान मिळणे शक्य झाले असेही यावेळी त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस , सभापती राहुल नार्वेकर तसेच प्रधान सचिवांच्या हस्ते कणकवली नगरपंचायत चा नगरविकास दिनी राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सन्मान करण्यात आला. हा बहुमान कणकवली शहरवासीयांना समर्पित करत आहे. सन 2022 – 23 सालमध्ये शहरविकासासाठी केलेले नवीन रिंगरोड, कोव्हीड काळात केलेले उत्कृष्ट काम, स्वछता, आरोग्य, शासनाचे विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविले , प्रशासकीय पातळीवरील करवसुली, बालोद्यान आदी बाबी लक्षात घेत राज्य शासनाकडून नगरपंचायत गटामध्ये कणकवली नगरपंचायत ला प्रथम क्रमांकाने सन्मानित केलेलं आहे.हा सन्मान समस्त कणकवलीवासीयांचा आहे अशी भावना नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना नलावडे, हर्णे म्हणाले की आमदार नितेश राणे यांनी वेळोवेळी उपलब्ध करून दिलेला विकास निधीमुळे हा सन्मान मिळाला आहे.सर्व सहकारी नगरसेवक, नगरपंचायत चे मुख्याधिकारी अवधूत तावडे, अधिकारी व कर्मचारी यांचाही या यशात वाटा आहे.कणकवली शहराच्या दृष्टीने हा सुवर्णक्षण आहे. यापुढे विकासकामांमध्ये अव्वल राहून कणकवली नगरपंचायत चा झेंडा राज्यात फडकत ठेवणार असल्याचेही नगराध्यक्ष नलावडें म्हणाले. यावेळी गटनेते संजय कामतेकर, बांधकाम सभापती ऍड. विराज भोसले, नगरसेवक बाबू गायकवाड, नगरसेविका मेघा गांगण,माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा