मालवण :
मालवण येथील बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम गुरुवार रात्री पासून सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अशी या क्रिकेट स्पर्धेची ओळख आहे. टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर २२ एप्रिलपर्यंत भव्यदिव्य स्वरूपात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान या स्पर्धेला शिक्षक परिषदेचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या आहेत.
गुरुवारी पहिल्या दिवशी मन्सूर स्पोर्टस् वायरी विरुद्ध राजाराम वॉरियर्स सावंतवाडी, ध्रुव पार्से, गोवा विरुद्ध जागृती डोंबिवली, शिरसाट स्पोर्टस् विरुद्ध सागर दांडी, मुंबई ०९ डोंगरी विरुद्ध संतोष पारकर कासार्डे संघांमध्ये रात्री उशीरापर्यंत सामने रंगून दोन संघ उपांत्य फेरीत दाखल होत आहेत.
उद्घाटन प्रसंगी उद्योजक डॉ. दीपक परब यांसह स्पर्धेचे सर्वेसर्वा तथा जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, सुशील कारखानीस, श्री. साटम, मालवण क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी नंदू देसाई, पप्पू परब, राजू वडवलकर, अजिंक्य पाताडे, गणेश कुशे, भाऊ हडकर, बबन रेडकर, अशोक सावंत, सौ. सायली परब, जगदिश चव्हाण, पूजा करलकर, विपुल परब, पूजा वेरलकर, चारू आचरेकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, नितीन मांजरेकर, सुशील शेडगे, बंड्या पराडकर, ललित चव्हाण, विक्रांत नाईक, सुमित सावंत, नमिता गावकर, हरिष गावकर, पप्पू कदम, राजू बिडये, नारायण लुडबे, संजय कदम, सोनू आचरेकर, प्रसाद पाटकर, अक्षय कदम, अमित सावंत, सुशील गावडे, विजय निकम, मनमोहन डिचोलकर, संदेश तळगावकर, अमित फाटक, विरेश मांजरेकर, महेश नाईक, राजा मांजरेकर, सुशांत चौगुले, पंकज गावडे, संजय कडू जॉमी ब्रिटो, लुईस फर्नांडिस यासह अन्य मान्यवर व बाबा परब मित्रमंडळ उपस्थित होते.
नीलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेतील विजेत्या संघाला तीन लाख पन्नास हजार व नीलेश राणे चषक, उपविजेत्या संघाला १ लाख ७५ व अन्य पारितोषिके आहेत. स्पर्धेत पंच म्हणून उमेश मांजरेकर, दिपक धुरी, ऑब्रोज आल्मेडा, मंगेश धुरी, सुशील शेडगे हे आहेत. गुणलेखन विल्सन फर्नांडिस हे काम करत आहेत. समालोचन प्रदीप देऊलकर, विजय बागायतकर, शाम वाक्कर, अमोल जमदाडे, बादल चौधरी म्हणून सामनाधिकारी म्हणून बंटी केरकर हे आहेत.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता गंगाई कसाल विरुद्ध रॉयल किंग सावंतवाडी, ६ वाजता रोहित स्पोर्टस् विरुद्ध दामू स्कुबा मालवण, ७ वाजता वैष्णवी डोंबिवली विरुद्ध उमेश इलेव्हन हुंबरठ, ८ वाजता एंजल्स कोलकत्ता विरुद्ध क्रांतीसिंह सांगली संघ यांच्यात सामने होणार आहेत. या सामन्यांतून दोन संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत. शुक्रवारी कोलकत्ता येथील प्रसिद्ध टेनिसबॉल क्रिकेटपट्टू रजत सरकार हा खेळाडू कोलकत्ता संघातून खेळताना दिसणार आहे.