व्यवसाय,कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी संपर्क साधावा
– जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
सिंधुदुर्गनगरी
मानव साधन विकास संस्थेचे एक अद्वीतीय मॉडेल परिवर्तन केंद्रच्या माध्यमातून व व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीतून सैनिकांची मुले, विधवा (पत्नी) यांना शैक्षणिक सहकार्य किंवा व्यवसाय,कौशल्य विकास प्रशिक्षण राबवण्याचा संस्थेचा मानस आहे. त्याकरीता सैनिक,माजी सैनिकांची मुले,विधवा पत्नी यांनी संचालक मानव साधन विकास संस्था, नविन प्राधिकरण (जनशिक्षण इमारत) ओरोस, सिंधुदुर्ग,अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- ८७७९६८५१२० यांच्याशी संपर्क करून वरील योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
मानव साधन विकास संस्था मुंबई हि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व त्यांचे सहकारी यांच्या संकल्पनेतुन साकारलेली, बॉम्बे पब्लीक ट्रस्ट कायदा 1950 अंतर्गत एक नोंदणीकृत विश्वस्त संस्था (नोंदणी क्रमांक ई- 16574 ) असुन सौ. उमा प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागातील विशेषत: सिंधुदुर्ग व रत्नागिरी क्षेत्रात कार्यरत आहे.