You are currently viewing गोवा येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा प्रबंधक पदी ॲड. विक्रम भांगले यांची नियुक्ती

गोवा येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा प्रबंधक पदी ॲड. विक्रम भांगले यांची नियुक्ती

हीगोवा येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा प्रबंधक पदी ॲड. विक्रम भांगले यांची नियुक्ती

सावंतवाडी

गोवा येथे आजपासून प्रारंभ होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी या क्रीडा प्रकारासाठी सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक ॲड. विक्रम भांगले यांच्यावर ‘स्पर्धा प्रबंधक या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया’ दिल्ली ने नुकतीच याची घोषणा केली आहे.

भारताला सर्वाधिक ऑलम्पिक आणि जागतिक पदक मिळवून देणाऱ्या शुटींग म्हणजेच नेमबाजी या क्रीडा प्रकारात ॲड. विक्रम भांगले यांचे नाव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ,आयोजक व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून ओळखले जाते. अनेक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये भारतीय ज्युनियर संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच अनेक जागतिक नेमबाजी स्पर्धा, कॉमनवेल्थ एशियन आशियायी व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धामध्ये त्यांनी पंच म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या या आजपर्यंतच्या उत्तम कामगिरीची आणि प्रदीर्घ अनुभवाची दखल घेत दिल्ली येथील नॅशनल रायफल असोसिएशन ने गोवा येथे सुरु होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारीच ॲड. भांगलेंकडे सोपविली आहे. देशपातळीवर होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘स्पर्धा प्रबंधक’ ही जबाबदारी मिळणे हा एक फार मोठा सन्मान समजला जातो. केवळ ही एकच जबाबदारी नव्हे तर या स्पर्धेसाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजक समितीने ‘डायरेक्टर ऑफ कॉम्पिटीशन ही आणखीन एक महत्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.ॲड भांगले हे गोवा राज्य नेमबाजी संघाचे सचिव तर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे मानद सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण क्रीडा वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*;

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 19 =