मुंबई
कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनलॉकच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हळूहळू अर्थव्यवस्था सुरू झाली मात्र शाळा आणि महाविद्यालंय बंदच होती. ऑनलाइन पद्धतीनं (Online Education) राज्यात शिक्षण दिलं जात आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत प्रश्न आणि चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्यात शाऴा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आला असून त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणं बाकी आहे.