You are currently viewing संपूर्ण राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिकांमध्ये इचलकरंजी महानगरपालिका अव्वल

संपूर्ण राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिकांमध्ये इचलकरंजी महानगरपालिका अव्वल

इचलकरंजी: प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन महानगरपालिका प्रशासनाने विविध कामकाजाबाबत विविध योजना, प्रशासन व्यवस्था व उत्पन्न वाढ यासोबत केलेल्या विविध कामांच्या मुल्यांकनामध्ये संपूर्ण राज्यात इचलकरंजी महानगरपालिकेने ‘ड’ वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. २० एप्रिल नगर विकास दिनाचे औचित्य साधून एन.सी.पी.ए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक किरण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी हा पुरस्कार स्विकारला. कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डाॅ. सुनिलदत्त संगेवार, जलअभियंता सुभाष देशपांडे व अभियंता अभय शिरोलीकर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांचे ५ गटात विभाजन करुन मुल्यांकन केले असून ‘ड’ वर्ग महानगरपालिकांच्या गटात प्रथम क्रमांक इचलकरंजी, द्वितीय मिरा भाईंदर तर तृतिय क्रमांक कोल्हापुर महानगरपालिकेस प्राप्त झाला आहे.
शहराच्या नावलौकिकासाठी सहभाग घेतलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, शहरातील सर्व नागरिक यांच्या सहभागामुळे व सकारात्मक प्रतिसादामुळेच प्रशासनाला सदरचे यश प्राप्त करता आले ,अशी प्रतिक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली.

_______________________________
*संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा