राष्ट्रीय लोकअदालत 30 एप्रिल रोजी
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने जिल्ह्यामध्ये रविवार दि. 30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका यांनी केले आहे.
या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित दिवाणी, तडजोडक्षम फौजदार, कौटुंबिक वाद, मोटर अपघात नुकसान भरपाई, भूसंपादन प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे (बँक, वित्तीय संस्था, ग्रामपंचायत,BSNL,MSEB, याची थकित रकमाची वादाची प्रकरणे ) ठेवण्यात आलेली आहेत. तसेच इच्छुक पक्षकार त्यांची प्रकरणे ठेवू शकतात.