सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने ठाणे येथील थीम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले._
_कॉलेजच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ मोबाईल ऑपरेटेड इलेक्ट्रिक वायर कटिंग मशीन’ या सादरीकरणाला द्वितीय क्रमांकाचे रु.10,000/- रोख पारितोषिक मिळाले. मेकॅनिकलचे विद्यार्थी यश परब, कैफ कुरेशी, तनिष सावंत, पार्थिव तळवणेकर, पुरुषोत्तम वंजारी व राज कळसुलकर यांनी प्रा.पुष्कर परब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुयश प्राप्त केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य गजानन भोसले व विभाग प्रमुख अभिषेक राणे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.