You are currently viewing महाविजय २०२४ अभियान अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील आसोली प.स.मतदारसंघामध्ये मेळावा

महाविजय २०२४ अभियान अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील आसोली प.स.मतदारसंघामध्ये मेळावा

वेंगुर्ले

भारतीय जनता पार्टीच्या महाविजय 2024 अंतर्गत जनसंपर्क अभियान मेळावा आसोली पंचायत समिती मतदार संघामध्ये अणसुर येथे घेण्यात आला . अणसुर सरपंच सत्यविजय गावडे यांच्या घरासमोरील मंडपात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान घेण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई ,तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , शक्तीकेंद्र प्रमुख गणेश गावडे व विजय बागकर , ता.का.का.सदस्य बिटू गावडे , ता.चिटणीस सुजाता देसाई , मोचेमाड बुथ प्रमुख उदय गावडे , मोचेमाड मा.सरपंच गुंडू गावडे , पाल सरपंच कावेरी गावडे , मातोंड शक्तीकेंद्र प्रमुख कमलेश गावडे , आसोली सरपंच बाळा जाधव , जेष्ठ नेते प्रकाश रेगे , मोचेमाड मा.सरपंच रसिका गावडे , आसोली बुथ अध्यक्ष गुरु घाडी , किसान मोर्चाचे सत्यवान पालव , बाळा गावडे , सागरतीर्थ बुथ प्रमुख बाळु वस्त , अणसुर उपसरपंच वैभवी मालवणकर , ग्रामपंचायत सदस्य संयमी गावडे व स्नेहल पालकर , नारायण ताम्हणकर , संदिप देसाई , प्रदीप मुळीक , वसंत गावडे , विलास गावडे , प्रकाश गावडे, नारायण गावडे तसेच अणसुर , पाल , मोचेमाड , आसोली ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी अणसुर सरपंच सत्यविजय गावडे यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली व इतर मान्यवरांचे स्वागत केले .तसेच गावातील अपुर्ण असलेली विकासकामे तसेच नवीन विकासकामांबाबत चर्चा केली .

प्रतिक्रिया व्यक्त करा