You are currently viewing मृत बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे कंपनीकडून अडीच लाखाचा धनादेश  सुपूर्द

मृत बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबीयांना हायवे कंपनीकडून अडीच लाखाचा धनादेश सुपूर्द

नगराध्यक्ष समीर नलावडे; उपनगराध्यक्ष यांचे विशेष प्रयत्न

कणकवली

हायवे ठेकेदार कंपनी च्या हलगर्जीपणा मुळे प्राण गमवलेल्या कै बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबातील सदस्य याना नुकसान भरपाई मिळवून देण्यात आला.शिशिर परुळेकर, महेश सावंत आणी कार्यकर्त्यांनी विवीध आंदोलन, सोशल मिडीयात आवाज उठवून कित्येक महीने हे आंदोलन सुरू ठेवले होते. त्याला आज यश आले . या प्रकरणात नगराध्यक्ष आणी उपनगराध्यक्ष यानी मोलाची बाजू मांडत तडजोड करीत कंपनीकडून 250000 ची मदत देण्यात आली.

या प्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेधा सावंत, महेश सावंत, आणी यानी ही रक्कम श्रीमती सुहासिनी तावडे याना सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी कुटुंबीयांनी सर्वाचे आभार मानले. शिशिर परुळेकर यांचे कुटुंबीयानी विशेष आभार मानत, नगराध्यक्ष आणी टीम ला धन्यवाद देत आशीर्वाद दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा