You are currently viewing आज कोर कमिटीची मुंबईत झाली बैठक

आज कोर कमिटीची मुंबईत झाली बैठक

भाजपाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुक कोर कमेटीवर आम. नितेश राणे

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई प्रदेशने गठीत केलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुक कोर कमेटीवर आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. आज या कमेटीची मुंबईत बैठक झाली.

या कमेटीत भाजपा च्या अनेक जेष्ठ नेत्यांचा समावेश असून मुंबई भाजपा प्रेदश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आमदार आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, आम.अतुल भातखळकर, आम. सुनील राणे, आम.अमित साटम, आम. प्रसाद लाड, मनोज कोटक, प्रवक्ते संजय उपाध्याय आदी नेत्यांचा या कमेटीत समावेश आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी या कोर कमिटीच्या नेत्यांचा अनुभव महत्वपूर्ण ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 4 =