दोडामार्ग
वायगंणतड येथील प्रथमेश वसंत सावंत (वय २९) या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मृतदेह विच्छेदनासाठी साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.दोडामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकुर व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.तर उशीरा शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई,वडील,एक भाऊ व विवाहीत बहीण असा परिवार आहे.
ही बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा अधिक तपास दोडामार्ग पोलीस संजय गवस करीत आहेत.