You are currently viewing कनिष्ठ अभियंता पदासाठी बारावीनंतर पदवी केलेल्या विद्यार्थ्यांना संधी द्या

कनिष्ठ अभियंता पदासाठी बारावीनंतर पदवी केलेल्या विद्यार्थ्यांना संधी द्या

वैभववाडी तालुका इंजिनिअरिंग असोसिएशनचे आमदार नितेश राणे यांना निवेदन

वैभववाडी

कनिष्ठ अभियंता या पदासाठी बारावीनंतर पदवी (अभियांत्रिकी) केलेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी या मागणीचे निवेदन वैभववाडी तालुका इंजिनियर असोसिएशनचे प्रतिनिधी अंकित सावंत यांनी आमदार नितेश राणे यांना दिले आहे.

सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग आणि मुंबई महानगरपालिका मधील कनिष्ठ अभियंता या गट ब अराजपत्रित पदासाठी पदविका व पदविका करून पदवीधर यांना पात्र करण्यात आले आहे. परंतु बारावीनंतर पदवीधारक (अभियांत्रिकी) यांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. यामुळे अनेक वर्षापासून बारावीनंतर पदवीधारक अभियंत्यावर अन्याय होत आहे. याबाबत वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा शासन स्तरावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कनिष्ठ अभियंता या पदासाठी उच्च अर्हता धारण करणारा उमेदवार नाकारू शकत नाही. त्यामुळे बारावीनंतर पदवीधर उमेदवारांना नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शासन स्तरावर बारावीनंतर पदवीधारक अभियंत्यांच्या मागणीचा प्राधान्याने विचार करावा व विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा, जवळपास चार ते पाच लाख अभियंत्यांचे होणारे नुकसान थांबणार आहे असे निवेदनात अंकित सावंत यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा