You are currently viewing घराघरात इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी आम.नितेश राणे यांचे प्रयत्न…

घराघरात इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी आम.नितेश राणे यांचे प्रयत्न…

मोदी सरकारची ऑप्टिकल फाइबर इंटरनेट’ योजना राबविणार सिंधुर्गात

योजनेचे प्रमुख अधिकारी श्रीवास्तव यांच्याशी झाली सकारात्मक चर्चा

ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण, रेशनिंग दुकान, ग्रामपंचायत, तलाठी कार्यलयातील इंटरनेट चे प्रश्न ही सुटणार

कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आता घराघरात इंटरनेट कनेक्शन मिळणार आहे. गावो गावच्या दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासाठी आवश्यक असलेल्या इंटरनेटचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. ही सुविधा लवकरच ‘ऑप्टिकल फाइबर इंटरनेट’योजने च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जतेला मिळणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी भरत सारकरच्या या योजनेचे प्रमुख अधिकारी श्रीवास्तव यांच्या सोबत मुंबईत अधीश निवस्थांनी चर्चा केली. लवकरच या योजनेची सुरवात सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे.
” प्रत्येक घरासाठी इंटरनेट म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचे स्वप्न! सिंधदुर्गने आज त्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. या नेट सेवेचे प्रभारी श्री. श्रीवास्तव यांच्या समवेत सिंधुदुर्गातील प्रत्येक घरात फाइबर इंटरनेट पोचविण्यासाठी सविस्तर चर्चा केली. जे इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.”असे ट्विट आमदार नितेश राणे यांनी करून या फायबर इंटरनेट ची माहिती दिली आहे.
ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण घेणे मुलांना नेट नसल्याने अशक्य झाले आहे. रेशनिंग दुकानावर थम लावण्यासाठी इंटरनेट ची गरज आहे., ग्रामपंचायत, तलाठी कार्यलय येथे दाखले मिळण्यासाठी इंटरनेट ची गरज भासते या सर्व प्रश्नावर फायबर इंटरनेट हा प्रधानमंत्री मोदी सरकारने दिलेला एकमेव उपाय आहे हे लक्षात घेऊन आमदार नितेश राणे यांनी मुंबईत या योजनेचे प्रमुख अधिकारी श्रीवास्त यांच्याशी चर्चा केली. लवकरच याचा सर्वे करून सिंधुदुर्ग मध्ये ही योजना सुरू करण्याचे आश्वासन श्रीवास्तव यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + ten =