You are currently viewing एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मालवण :

आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती जयवंती बाबू फाऊंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज सुकळवाड येथे साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत नवले, अँडमिन ऑफिसर राकेश पाल, प्रा. तुषार मालपेकर, ग्रंथालय प्रमुख अपर्णा मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. एक्झाम डीन विशाल कुशे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पालव यांनी केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य सुयकांत नवले यांनी बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेतला. या कार्यक्रमाला सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन विलास पालव यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा