You are currently viewing सुषमा मांजरेकर यांना शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

सुषमा मांजरेकर यांना शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

सुषमा मांजरेकर यांना शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

सावंतवाडी

आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर (गोडकर )यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.
५ सप्टेंबर या शिक्षक दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे सौ. मांजरेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख दहा हजार रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
समाजाची निःस्वार्थ भावनेने व निष्ठेने सेवा करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामांला प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाकडून शिक्षक दिनी पुरस्कार जाहीर केले जातात. राज्यभरातील १०८ शिक्षकांना पुरस्कार जाहीर करण्यात आलेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सौ. मांजरेकर यांची माध्यमिक विभागातून निवड करण्यात आली आहे. शाळांतर्गत तपासणी, जिल्हास्तरिय मुलाखत व राज्यस्तरीय समितीकडून मुलाखत अशा तीन टप्प्यात पुरस्कार निवड प्रक्रिया झाली.नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण समितीवरही सौ. मांजरेकर कार्यरत आहेत.
सौ. सुषमा प्रवीण मांजरेकर (गोडकर) या गेली २१ वर्षे आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागामध्ये त्या मराठी व हिंदी विषयाचे अध्यापन करीत आहेत. मराठी, हिंदी, अर्थशास्त्र या तीन विषयात त्यांनी एमए पदवी संपादन केली आहे. तसेच शालेय व्यवस्थापन पदवी त्यांनी संपादन केला असून एम एड पदवी चा त्यांचा अभ्यासही सुरू आहे. कोकण बोर्ड मराठी विषय तज्ञ मार्गदर्शक, कोकण बोर्ड मॉडरेटर म्हणूनही सौ. मांजरेकर कार्यरत आहेत. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांच्या अंधायुग या नाटकाचे त्यांनी मराठीत पुनर्लेखन केले असून या नाटकाचे प्रयोगही महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा, महाराष्ट्र कामगार कल्याण नाट्य स्पर्धा विक्रोळी मुंबई, व अन्य ठिकाणी प्रयोग झाले आहेत. याशिवाय शुद्ध लेखनात येणाऱ्या समस्या व उपाययोजना या विषयावर लघु प्रबंध, कोरोना कालावधीतील आँनलाईन शिक्षण व उपाययोजना या विषयावर दीर्घ निबंध लेखनही केले आहे. कोरोना काळातील आँनलाईन शाळा व शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी हे उपक्रमही सौ मांजरेकर यांनी राबविले आहेत. त्यांच्या अध्यापनाचे vdo ही यू ट्यूबवर आहेत. कोरोना महामारी काळात गोवा विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची १० वी १२ वी परीक्षा घेण्यातही त्यांनी सहकार्य केले होते. याशिवाय अनेक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धांमध्ये सौ मांजरेकर यांनी पारितोषिके पटकावली आहेत. शासकीय व विविध संस्थांच्या वकृत्व व निबंध स्पर्धेत परीक्षक म्हणूनही काम केले आहे. सौ मांजरेकर यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. या निवडीबद्दल सौ मांजरेकर यांचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर,शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे,शिक्षण उपसंचालक महेश चोथे, शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले उपशिक्षण अधिकारी रामचन्द्र आंगणे गटशिक्षाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नीलेश परब, स्कूल कमिटी चेअरमन हेमंत कामत सचिव शांताराम गावडे, सर्व संस्था पदाधिकारी, संचालक, शिक्षक पालक संघ, मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थि पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. प्रा. सौ. मांजरेकर या सातोसे रहिवासी तर तळवडे येथील ट्रक व्यवसायिक नाना गोडकर यांच्या सुकन्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + nineteen =