*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वायदा …*
पपा हो पपा चला मारू या ना गप्पा
बघां हं पपा तुम्ही मारू नका थापा…
काल म्हणे बागेत तुला घेऊन मी जाईन
मी म्हटले तिथे मी आईस्क्रीम खाईन..
मग काय तुमचा बदललाच बेत
ग्राऊंडवरती खेळायला घेऊन गेलात थेट..
पळापळीत खूप मी थकूनच गेलो
खांद्यावरती चक्क तुमच्या झोपूनच गेलो…
सकाळी उठताच मला आईस्क्रीम आठवले
गोड गोड बोलून तुम्ही चक्क मला फसवले…
का हो पपा तुम्ही मारता अशा थापा
बोललो तर वरून मग घेतात किती पापा…
खुश होऊन पाप्यानेच भरून जाते पोट
झोपेतच आईस्क्रीमने हलतात मग ओठ…
पुन्हा तुम्ही करता वादा आईस्क्रीम खायचा
मला नाही वाटत तो कधी पुरा व्हायचा…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १५/४/२०२३
वेळ : दुपारी ४/३०