You are currently viewing यशोदामाई

यशोदामाई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे यांनी आदरणीय माईंसाठी लिहिलेले दोन शब्द 🙏*

*” यशोदामाई “*

सिंधुताई सपकाळ
दु:ख कष्ट दूर सारी
अनाथांना पोटी धरी
त्यांच्या शिरी छत्र धरी ||

दिला अनाथांना हात
त्यांची बनुनिया आई
स्विकारले आईपण
बनुनी यशोदामाई ||

कित्येकांच्या आयुष्याला
दिला घराचा उबारा
दिले संस्कार शिक्षण
व्यक्तिमत्वे ये आकारा ||

अशा माऊलीची साथ
आज अवेळी सुटली
साऱ्या अनाथांना पुन्हा
अनाथ करून गेली ||

मार्ग तिने दाखविला
देत वत्सल सावली
त्यांच्या थोर कर्तृत्वाला
भावपूर्ण श्रद्धांजली ||

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =