बांदा
हिरकणी नारी शक्ती ट्रस्ट मुंबई आणि मैत्री महिला मंडळ बांदा यांच्या संयुक्त आयोजनातून बांदा येथे रविवार दिनांक १६ रोजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी ३.३० वाजता येथील विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात स्पर्धा संपन्न होणार आहे. स्पर्धेसाठी अंडी किंवा रताळी यापासून पदार्थ तयार करून आणायचा आहे. जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्षा सौ. अर्चना पांगम यांनी केले आहे.