You are currently viewing सूर्यनमस्कार सूर्योपासना

सूर्यनमस्कार सूर्योपासना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य कवी गायक संगीतकार श्री.अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

*”सूर्यनमस्कार सूर्योपासना “*

करू सूर्य देवास साष्टांग नमन
देई आरोग्य संस्कार करी संपन्न!!ध्रु!!
रवी सर्व तारांगणाचा राजा महान
सर्वाधिक ऊर्जा देई असे तेजवान!!1!!
सूर्य प्रगती पराक्रमाचे आहे चिन्ह
देई वैभव राखतो सामर्थ्यवान!!2!!
ज्योतिर्मय दाहक परि संजीवक
चैतन्य मूर्ती तरुणारूण किरण!!3!!
ब्रह्मांड सार सर्वस्वाची देई जाण
पृथ्वीवरचा परमात्मा असे हिरण्य!!4!!
विविध वर्णांची गुणधर्मांची किरणं
देई ऊर्जा सौष्ठव जीवनसत्व धान्य!!5!!
आहे सत्तारूपी देतो प्रकाश सर्वत्र
रोगजंतू करी नष्ट ठेवी प्रसन्न!!6!!
देतो प्रेरणा चेतना परमात्मा ज्ञान
वेद गायत्री मंत्राची देवता अनन्य!!7!!
ओम् मधून प्रगटे वाणी उच्चारण
देई प्रकाश प्रज्ञा प्रतिभा शुद्धता ज्ञान!!8!!
दिव्य तेजाने झगमगते सदा भुवन
अणू रेणू उजळे देई अमृतकण!!9!!
अर्घ्य देऊ भास्करां करू नित्य नमन
उद्गाता विधात्याचे सदा मानु ऋण!!10!!

श्री अरुण गांगल
कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell 9373811677.

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा