*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
तू मला दिलेले शब्द पाळ ना सखे
सखेsssगं
शब्द पाळ ना सखे ।।धृ।।
मुक्या रवीचा मिटता डोळा
मम वाटेवर ठेवा डोळा
गंध जुईचा ठुमकत येईल
असे बोलली सखे ।।१।।
मुक्या रात्री तू येशिल वदली
चंद्रप्रकाशी पहा सावली
आपण दोघे एक होऊ या
बोलुन बोल मुके ।।२।।
देहस्पंदने अधिर होवू द्या
तमात हिरव्या नजर भिडू द्या
स्वर्गसुखाला आस्वादिन मी
जरा वितळता धुके ।।३।।
🙏🙏
कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
“नाथसदन”, मु.पो.पिंपळनेर,
ताो. साक्री जि. धुळे ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷