You are currently viewing शनिवारी ठाकरे शिवसेना गटाची सभा

शनिवारी ठाकरे शिवसेना गटाची सभा

वैभववाडी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वैभववाडी तालुका कार्यकारिणीची सभा शनिवार दिनांक-१५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता वृंदावन रिसॉर्ट वैभववाडी येथे आयोजित केली असून या सभेला आमदार वैभव नाईक, कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न होणार आहे.

तरी तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, उपतालुकाप्रमुख, माजी जि.प. सदस्य,माजी पं.स.सदस्य, विभाग प्रमुख,वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे सर्व आजी-माजी नगरसेवक,उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख,बूथ प्रमुख, महिला शाखाप्रमुख, तसेच युवासेनेचे सर्व पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, सोसायटी संचालक आदींसह शिवसैनिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा