You are currently viewing मालवण तालुका भाजप महिला पदाधिकारी नियुक्त्या जाहीर…

मालवण तालुका भाजप महिला पदाधिकारी नियुक्त्या जाहीर…

मालवण

भारतीय जनता पार्टी मालवण महिला कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तालुकाध्यक्ष पूजा करलकर व शहराध्यक्षा चारुशीला आचरेकर यांनी जाहीर केल्या.
मालवण तालुका ग्रामीण उपाध्यक्षपदी माधुरी मसुरकर, मालवण तालुका उपाध्यक्षपदी राणी पराडकर, शहर उपाध्यक्षपदी वैष्णवी मोंडकर, शहर सरचिटणीसपदी महिमा मयेकर, युवती अध्यक्षपदी सिद्धी माणगावकर तर उपाध्यक्षपदी दिव्या कोचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करताना सर्वसामान्य जनतेला न्याय देणे, पक्ष संघटना वाढविण्यासाठी जोमाने काम करा असे सांगत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सौ. करलकर, सौ. आचरेकर यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, महानंदा खानोलकर, तारका चव्हाण आदी ज्येष्ठ महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा