You are currently viewing जगदीश कातकर यांची कणकवली प्रांताधिकारीपदी नियुक्ती 

जगदीश कातकर यांची कणकवली प्रांताधिकारीपदी नियुक्ती 

कणकवली

कणकवली प्रांताधिकारी म्हणून यापूर्वी कणकवलीत नायब तहसीलदार, तहसीलदार पदावर कार्यरत असलेले जगदीश कातकर यांना कणकवली उपविभागीय अधिकारी म्हणून बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे. जगदीश कातकर हे यापूर्वी कणकवली तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. काही काळ त्यांनी कणकवली चे प्रभारी तहसीलदार म्हणूनही काम केले होते. तत्पूर्वी दोडामार्ग तालुक्यामध्ये त्यांनी नायब तहसीलदार म्हणून प्रोबेशनरी काम केले होते. त्यानंतर कणकवली व तेथून देवगड तहसीलदार पदावर यांनी काम केल्यावर चिपळूण तहसीलदार व त्यानंतर कोकण भवन येथे पुरवठा अधिकारी म्हणून काम केले होते. सध्या ते नागपूर येथे उपजिल्हाधिकारी राजशिष्टाचार या पदावर कार्यरत आहेत. कणकवली प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली राजमाने यांची बदली प्रस्तावित असून त्यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या या पदावर श्री. कातकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा