You are currently viewing सावंतवाडी पंचायत समितीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या आमदारनिधीतून संगणक प्रदान

सावंतवाडी पंचायत समितीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या आमदारनिधीतून संगणक प्रदान

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक व कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या आमदार निधीमधून प्रशासनाचा कारभार प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी पाच संगणक व पाच प्रिंटर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती श्री अशोक दळवी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

यावेळी गजानन नाटेकर, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, माजी नगरसेवक श्री. तानाजी वाडकर, खेमराज ऊर्फ बाबु कुडतरकर, सावंतवाडी पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री. गजानन धर्णे, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, विस्तार कृषी अधिकारी गणपत लोंढे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुजीत येरवलकर, अधिक्षक जितेंद्र सावंत, एकनाथ हळदणकर पंचायत समिती कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

गतीमान प्रशासन चालण्यासाठी संगणकांच्या माध्यमातून सहकार्य केल्याबद्दल मा.ना. श्री. दिपकभाई केसरकर यांचे सर्व कर्मचारी वृदांच्यावतीने आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा