You are currently viewing भेलड्या माडाची तोड करणाऱ्यांवर कारवाई करा

भेलड्या माडाची तोड करणाऱ्यांवर कारवाई करा

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची वन अधिकारी यांच्याकडे मागणी

सावंतवाडी

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भेलड्या माडाची तोड ताबडतोब थांबवण्यात यावी. परप्रांतीय लोक ह्या माडाची तोड करून सुशोभिकरण करण्यासाठी मुंबई येथे विक्री साठी वापरली जात आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी वन अधिकारी यांना भेटून केली आहे. अशा प्रकारे जर या माडाची तोड होत राहिल्यास या माडाची प्रजाती नष्ट होऊ शकते अशी भीती त्यानी यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी यापुढे या माडांची तोड केल्यास त्या व्यक्तीवर योग्य ती कडक कारवाई करणार असे वन अधिकारी एस. डी. नरणवर यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना देखील तशा सूचना दिल्या आहेत.यावेळी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 5 =