ज्युदो,कराटे,कुस्ती, आट्यापाट्या, योगा, स्क्वॅश,कबड्डी,कॅरम व मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
तळेरे: प्रतिनिध
कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष सन 2022/ 23 या वर्षात शालेयस्तर, जिल्हास्तरीय, विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त केलेल्या सुमारे ५५० पेक्षा अधिक खेळाडूंचा गुणगौरव कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे स्थानिक व्यवस्था समिती पदाधिकारी, स्कुल कमिटी पदाधिकारी, प्राचार्य, पर्यवेक्षक यांच्या शुभहस्ते नुकताच प्रशालेच्या डिजिटल हॉल मध्ये संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर स्थानिक व्यवस्था समितीचे माजी कार्याध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर कुडतरकर,स्थानिक व्यवस्था समितीचे विद्यमान कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कुल कमिटी चेअरमन अरविंद कुतरकर, प्राचार्य एम.डी.खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर,
बबन नारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
*१६ राष्ट्रीय ,१८ राज्य व 52 खेळाडुंची विभागस्तावर मजल..*
यावर्षी कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत यश संपादन केले. यामध्ये राष्ट्रीयस्तरावर पदक विजेते १६ कराटेपट्टू,१८खेळाडू ज्युदो,कराटे व योगा मधून राज्यस्तरावर पात्र झाले होते. तसेच कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले 52 खेळाडूमधुन शालेय ज्यूदो स्पर्धेत विभाग स्तरावर यशस्वी झालेले ज्युदो पट्टू तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग मार्फत आयोजित शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या खेळातील ४६ खेळाडू, कराटे स्पर्धेतील ३२ खेळाडू, कुस्ती स्पर्धेतील २३ खेळाडु,ज्युदो खेळातील १४ खेळाडू, कबड्डी स्पर्धेतील १२ खेळाडू, स्क्वॅश खेळातील ६ खेळाडू ,मैदानी स्पर्धेतील २ खेळाडूं व इतर खेळातील मिळून असे एकुण १४८ खेळाडूंनी या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत 1 ते 3 क्रमांक पटकाविला आहे. तसेच कॅरम स्पर्धेतही एका खेळाडुंने चतुर्थ क्रमांक पटकाविला होता.
*550 पेक्षा अधिक खेळाडूंचा गुणगौरव*
विशेष म्हणजे यावर्षी कासार्डे विद्यालयाच्या तब्बल ५२ खेळाडूंनी वरील क्रीडा स्पर्धेतून विद्यालयासाठी जिल्ह्याचे विजेते पद पटकावून दिले, या समारंभात विविध क्रीडा स्पर्धेतील मिळून सुमारे ५५० पेक्षा अधिक गुणवंत खेळाडूंचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच शालेय ‘क्रीडा महोत्सवा’अंतर्गत आयोजित विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा- कब्बडी,रस्सीखेच, व्हॉलीबॉल, यासारख्या सांघीक स्पर्धा तसेच१००,२०० मी. धावणे मैदानी स्पर्धा तसेच मनोरंजक खेळातील विविध स्पर्धा मिळून ३८३ पेक्षा अधिक यशस्वी खेळाडुंचा ही याप्रसंगी प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
तसेच सावंतवाडी येथे झालेल्या खुल्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत प्रशालेतील ३२ पदक विजेत्या खेळाडूंचा तसेच ओरोस येथील जिल्हास्तरीय योगा स्पर्धेमधील ११ पदक विजेत्या खेळाडूंचा गुणगौरव यापुर्वीच संपन्न झाला आहे.
*दैदिप्यमान यशासाठी कठोर मेहनतीची गरज:- संजय पाताडे*
याप्रसंगी स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे खेळाडुंना उद्देशून म्हणाले की, दैदिप्यमान यश संपादन करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते,आपले हे यश नक्कीच कौतुकास्पद असून ,प्रत्येक विद्यार्थ्याने निरोगी राहण्यासाठी अभ्यासाबरोबरच खेळातही सातत्य ठेवावे आणि आपल्या विद्यालयाची क्रीडा क्षेत्रातील परंपरा कायम टिकविण्याचे त्यांनी आवाहन केले.
*आंतरीक कौशल्य विकसित होण्यासाठी खेळ महत्वाचे:-प्रभाकर कुडतरकर*
खेळामुळे मनुष्यात धैर्य सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होतो. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि मुलांच्या अंतरिक कौशल्याचा विकास होण्यासाठी मानवी जीवनात खेळ हे अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी कार्याध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांनी केले
………………………………
याशिवाय याप्रसंगी प्राचार्य एम.डी.खाड्ये,बबन नारकर व पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर यांनी मनोगत व्यक्त करतांना खेळाडूंचे विशेष अभिनंदन करुन कौतुक केले.
*मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक…*
यावर्षी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या खेळाडूंना विद्यालयचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,संजय भोसले,सौ.रजनी कासार्डेकर,सौ.मानसी कुडतरकर,अनिल जमदाडे,रामचंद्र राऊळ, यशवंत परब,दिवाकर पवार, विनायक पाताडे,सौ.वैष्णवी डंबे,सौ.पुजा पाताडे,देवेंद्र देवरुखकर,कु.प्रियंका सुतार, ऋषिकेश खटावकर,नवनाथ कानकेकर तसेच ज्युदो कराटे कोच अभिजित शेट्ये,सोनु जाधव आदींनी शिक्षकांनी मेहनत घेऊन उत्कृष्ट गुणवंत खेळाडू घडविल्याबद्दल विद्यालयचे प्राचार्य एम.डी.खाड्ये व पर्यवेक्षक एन.सी.कुचेकर यांनी या सर्व क्रीडा मार्गदर्शकांचेही विशेष कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामचंद्र राऊळ यांनी केले तर आभार एन.सी.कुचेकर यांनी मानले.
कासार्डे: कासार्डे माध्यमिक विद्यालयातील खेळाडूंचा गुणगौरव करताना संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक पर्यवेक्षक व इतर मान्यवर