You are currently viewing “नाद बाईचा” जुगाराच्या बेताज बादशहाच्या अंगलट…

“नाद बाईचा” जुगाराच्या बेताज बादशहाच्या अंगलट…

बेताज बादशाह झाला गुलाम

जुगाराचा बेताज बादशाह आणि दारूचा तस्कर म्हणून नावाजलेला दात पडक्या आप्पा बाईच्या प्रकरणात पूर्णतः हैराण झालाय.. बाईला फोन मेसेज करणे, अश्लील व्हिडीओ पाठविणे आणि बाईच्या जाळ्यात फसून तिच्या बोलविण्यामुळे घरी जाणे त्याच्या अंगलट आले आणि त्या बाईने दात पडक्या आप्पाला अद्दल घडविण्यासाठी रचलेल्या जाळ्यात बादशाह अडकला आणि फासकीत वाघ अडकतो तसाच घरातील खोलीत जेरबंद झाला.
मध्यस्तीने घरातून दात पडक्या आप्पा बाहेर पडला, परंतु महिलेच्या सन्मानाला ठेच पोहचविण्याचा काय परिणाम असतो याचा प्रत्यय त्याला येत आहे. महिलेशी केलेली घृणास्पद वागणूक आणि त्यातून घडलेल्या महाभारतातून बाहेर पडण्यासाठी दात पडक्या आप्पा बादशहाचा गुलाम बनला आणि एका राजकीय नेत्याकडे मदतीसाठी गेला. नेत्याने आपल्या एका पदाधिकाऱ्याला फोन करून हे नाजूक प्रकरण मिटविण्यास सांगितले. राजकीय नेत्याच्या पदाधिकार्याने पीडित महिलेला दात पडक्या आप्पा हा राजकीय नेत्यांच्या जवळचा आहे, चक्रीवादळात त्याने लोकांना पत्र्यासाठी पैसे दिले, त्यामुळे त्याला राजकीय पाठबळ आहे, तुम्ही दोन लाख रुपये मिळतात ते घ्या आणि हा विषय थांबवा.
राजकीय नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्यावर पीडित महिला संतापली, तिने त्याचा पाणउतारा करत फटकारले. त्यामुळे त्याने काढता पाय घेतला.. दात पडक्या आप्पाच्या फोन प्रकरणामुळे सतावलेल्या महिलेने भविष्यातही आपल्याला त्या व्यक्तीकडून त्रास होऊ शकतो म्हणून महिला दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. महिला दक्षता समितीने हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे पैशांच्या जोरावर महिलांवर अन्याय करणाऱ्या दात पडक्या आप्पा सारख्या धनाढ्य लोकांना नक्कीच जबर बसेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा