पणदूर शाळा नं. २ येथे राष्ट्रीय पोषण पंधरवडा अंतर्गत “पोषण आहार जत्रा” उपक्रम साजरा

पणदूर :

राष्ट्रीय पोषण पंधरवडा अंतर्गत आज पणदूर शाळा नं. २ येथे पोषण आहार जत्रा उपक्रम साजरा करण्यात आला.

या उपक्रमात पाककला प्रदर्शनामध्ये पालकांसह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी अंगणवाडी व शाळेतील मुलांच्या माता व पालकांनी अनेक प्रकारचे पौष्टीक पदार्थ बनवून उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. संजना नाईक, माता पालक संघ, पालक शिक्षक संघ सदस्य, अंगणवाडी पालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =