You are currently viewing पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली सांगेलीतील नुकसानीची पाहणी; सरसकट पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली सांगेलीतील नुकसानीची पाहणी; सरसकट पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना

सावंतवाडी :

सह्याद्रीच्या पट्ट्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सांगेली सावरवाड व कलंबिस्त या गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीची सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगेली गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्याकडून माहिती घेतली.

यावेळी त्यांनी सरसकट पंचनामे करा कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सक्त सूचना यावेळी दिल्या आहेत.
अवेळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच वादळी वाऱ्याने सह्याद्रीच्या पट्ट्यात तीन ते चार गावांना जोरदार तडाखा मिळाला असून यात सांगेली गावाचे जवळपास 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मंत्री चव्हाण यांचे गावचे सरपंच लहू भिंगारे यांनी स्वागत केले यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली,जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर संजू परब,मनोज नाईक,संदिप गावडे,पंढरी राऊळ, संतोष नार्वेकर,वामन नार्वेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा