You are currently viewing ओवळीये रामेश्वर मंदिर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त लघुरुद्र व महाप्रसाद

ओवळीये रामेश्वर मंदिर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त लघुरुद्र व महाप्रसाद

मालवण

केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्ताने भाजप प्रदेश सदस्य उद्योजक दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून व आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने ओवळीये श्री देव रामेश्वर मंदिर येथे सोमवारी लघुरुद्र धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तर दुपारी महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमास भाविक व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.

यावेळी दत्ता सामंत यांच्यासह सुनील घाडीगांवकर, महेंद्र चव्हाण, राजू परुळेकर, सुशांत घाडीगांवकर, नंदू आंगणे, प्रशांत परब, दादा परब, बाळा लाड, मकरंद राणे, विश्वास परब, बाळा राऊत, समीर सावंत, बाबू परब, राजेश तांबे, दया हाटले, बबन परब, तुषार हाटले यासह मंदार लुडबे, भाई मांजरेकर व अन्य उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा