You are currently viewing अनधिकृत  वाळू वाहतूक करणाऱ्या 81 वाहनांवर कारवाई; 70 लाख 90 हजाराचा  दंड वसूल

अनधिकृत  वाळू वाहतूक करणाऱ्या 81 वाहनांवर कारवाई; 70 लाख 90 हजाराचा  दंड वसूल

– तहसिलदार श्रीधर पाटील

सिंधुदुर्गनगरी,

 महसूल विभागाकडून अनधिकृत वाळू वाहतूक रोखण्यासाठी निर्माण केलेल्या स्थिर व भरारी पथकामार्फत कारवाई केले जाते. तसेच बंदर निरीक्षक मालवण यांना दिनांक 7 नोव्हेंबर 2022 व 20 जानेवारी 2023 रोजी कार्यालयाकडून परवानगी नोंदणी नसलेल्या बोटींवरही कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आलेला आहे. तसेच अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियमितपणे कारवाई  केली जात आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात 81 वाहनांवर कारवाई करुन रु 70 लाख 89 हजार 730 इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे, अशी माहिती मालवण तहसिलदार श्रीधर पाटील यांनी दिली.

      कालावल खाडीपात्रात वाळू गट सी 1 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून शुभम शंकर रेवंडकर, पंढरीनाथ सुरेश हडकर, प्रविण जगन्नाथ खोत, अरुण दयाळ खोत व आदित्य प्रमोद कावले अशा एकूण 5 वाळू लिलावधारकांना परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच वाळू गट सी 2  मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. मसुरे जुवा बेट नजीक कालावल खाडीपात्रात होणाऱ्या अधिकृत वाळू उत्खनन व  वाहतुकीवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना  दिलेल्या आहेत. अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्यासाठी संबंधीत मंडळ अधिकारी हे अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभे केलेले रॅम्प तक्रार प्राप्त होताच नष्ट करण्यात येत असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा