You are currently viewing कणकवली पटकीदेवी मंदिर ते वैकुंठ धाम रस्त्याच्या कामाचा शुभारंभ….

कणकवली पटकीदेवी मंदिर ते वैकुंठ धाम रस्त्याच्या कामाचा शुभारंभ….

कणकवली :

कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून शहरात विकास कामांचा जोरदार धडाका सुरू असून, अनेक विकास कामांचा शुभारंभ करून ही विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर ते वैकुंठधाम पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज कणकवली शहरातील गावपुरुष मंगेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या कामाकरिता राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला असून, गेले अनेक वर्षे हे काम मार्गी लावण्याची मागणी शहरवासीयांमधून केली जात होती. याबाबत येथील स्थानिकांना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांकडून आश्वासित देखील करण्यात आले होते. त्यानुसार या कामाकरिता नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शहरातील अनेक विकास कामांना निधी उपलब्ध करून देत असताना शहरातील दळणवळणाच्या सुविधेमध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या रस्त्यांच्या कामांकरिता सुद्धा भाजपा शिवसेना युतीच्या सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

या कामाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, नगरसेविका मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, सुशील पारकर, राजन परब, चारुदत्त साटम, कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर ते वैकुंठ धाम रस्त्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, नगरसेविका मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, सुशील पारकर, राजन परब, चारुदत्त साटम, बाळा राणे, मारूती राणे, विलास राणे, दिलीप साटम,बंडू गांगण, जीजी राणे, विष्णू राणे, रामा ठाकूर, तुषार बेळेकर, आणाजी राणे, व सर्व व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा