दोडामार्ग
सावंतवाडी मतदार संघातील दोडामार्ग तालुक्यातील मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने सासोली येथे आज भाजपातर्फे लोकप्रतिनिधि व प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले.
रास्ता रोखो आंदोलनात महाविकास आघाडी सरकार चा निषेध म्हणून ३ व्यक्तींचे मुंडन करण्यात आले.
तर प्रशासनाचा निषेध व्यक्त करत भजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागचे उप अभियंता विजय चव्हाण यांच्या समक्ष भाजपा पदाधिकारी यांनी व्यथा मांडल्या अन् संबधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पोलिस प्रशासन मोठ्या प्रमाणात तैनात होते.
त्यानंतर जि.प.उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, सुधीर दळवी, संतोष नानचे यांच्या उपस्थितीत दोडामार्ग-सावंतवाडी मार्गावर सासोली येथे रस्त्यांवर ठांण मांडत रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले.
यावेळी ३० नोव्हेबर पर्यत खड्डेमय असलेले तालुक्यातील मुख्य रस्ते सुस्थितीत करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागचे उप अभियंता विजय चव्हाण यांनी दिले.