ओरोस
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा कुडाळच्या वतीने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली होती. याच परीक्षेतील प्रथम १० विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम १२ एप्रिलला हॉटेल लाईम लाईट सभागृह, माने जी क्रिएशन, ग्रामीण रुग्णालयासमोर कुडाळ येथे दुपारी ३ ते ६ या वेळेत तालुकाध्यक्ष प्रशांत वारंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमासाठी राज्य सल्लागार प्रकाश दळवी, राज्य कोषाध्यक्ष विनयश्री पेडणेकर, राज्य संयुक्त चिटणीस म ल देसाई, राज्य संघटक प्रशांत पारकर, तसेच जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे, तसेच जिल्हा सल्लागार के टी चव्हाण, विजय केळकर, गुरुदास कुबल हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुण्या म्हणून डायट सिंधुदुर्गच्या अधिव्याख्याता श्रीमती सुषमा कोंडुसकर या उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी गुणगौरवा सोबत इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, पुरस्कार प्राप्त शिक्षक, बदलीने कुडाळ तालुक्यात आलेले शिक्षक तसेच सेवानिवृत्त शिक्षक यांचा गौरव करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन तालुका सचिव एकनाथ कुर्लेकर यांनी केले आहे.