You are currently viewing दशावतारी महोत्सव म्हणजे लोककलेचा सन्मान : भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली

दशावतारी महोत्सव म्हणजे लोककलेचा सन्मान : भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली

रेडी येथील दशावतारी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले

आमचे नेते नारायण राणे यांनी ग्रामीण भागातून जाऊन राज्याच्या मुख्यमंत्री आणि आता केंद्रापर्यंत जात केलेले काम या जिल्ह्याला आदर्शवत आहे. त्यांच्या वाढदिवसा निमित्त दशावतारी महोत्सव आयोजित करून लोककलेचा सन्मान केला जातोय हा स्तुत्य उपक्रम आहे. प्रितेश राऊळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो की रेडी गावात सातत्याने ते विविध उपक्रम राबवत असतात,असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी रेडी येथे बोलताना केले.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढिवसानिमित्त रेडी येथे प्रितेश राऊळ मित्रमंडळाच्या वतीने पुरस्कृत आणि दशावतार कला प्रेमी ग्रुप रेडी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दशावतार नाट्य महोत्सवाचे उदघाटन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर, पं.स. माजी सदस्य मंगेश कामत , रेडी सोसायटी चेअरमन चित्रा कनयाळकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, मच्छिमार नेते वसंत तांडेल, रेडी तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर राऊळ, जेष्ठ दशावतार कलावंत जयसिंग राणे, दादा नाईक, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजाता देसाई, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, गोरे दशावतार नाट्य मंडळाचे मालक सुधाकर दळवी, मनोहर होडाडेकर, रेडी ग्रा. प. सदस्य मानसी राणे, कलच्यावकर, शमिका नाईक, रिचा सावंत, गणेश भगत, रश्मी रेडकर, आनंद भिसे, आरवली ग्रा प सदस्य सोनाली कुडव, रेडी माजी ग्रा प सदस्य गायत्री सातोस्कर, विधी राणे, दीपक राणे, स्नेहल राणे, सौ, करलकर , मधुरा नाईक, विजय बागकर, अण्णा गडेकर, सागर राणे, आबा राणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा