सावंतवाडी
कोलगाव येथील निरामय विकास केंद्र या संस्थेचा यावर्षीचा आरोग्यलक्ष्मी पुरस्कार तळेरे येथील सेवाभावी डॉ ऋचा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. संस्थेच्या १४ व्या वर्धापनदिन सोहळयात संस्थेच्या उपाध्यक्षा सुधा सबनिस यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार डॉ ऋचा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर संस्थेच्या अध्यक्षा डॉ अनघा सबनीस सचिव वंदना करंबेळकर, प्रसाद घाणेकर, अर्चना वझे, वामन पंडित, डॉ शमिता बिरमोळे, डॉ गौरी गणपत्ये, अस्मिता नाईक, गीता सावंत, डॉ मिलिंद कुलकर्णी, डॉ विजयालक्ष्मी चिंडक आदी उपस्थित होते.
वर्धापनदिन सोहळयाचे उद्दघाटन दीपप्रज्ज्वल आणि संस्थापक अध्यक्षा शालिनी सबनिस यांच्या प्रतिमेला प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर निरामय गीत सादर करण्यात आले. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ शालिनी सबनिस यांच्या स्मृति प्रित्यर्थ दरवर्षी आरोग्यासह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आरोग्यलक्ष्मी पुरस्कार दिला जातो. यावर्षी डॉ ऋचा कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन वंदना करंबेकर यांनी केले.
तळेरे सारख्या ग्रामीण भागात डॉ ऋचा कुलकर्णी यांनी १९९६ पासून रूग्णांची सेवा करताना दोन पिढ्यांचे आरोग्य रक्षण करून चांगली सेवा दिल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने करण्यात आले. यावेळी त्यांच्या आरोग्य व सामाजिक कार्याची सर्वांना माहिती व्हावी म्हणून त्यांची प्रसाद घाणेकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी डॉ ऋचा कुलकर्णी यांनी आपल्या जीवनातील विविध अनुभव कथन करताना मनातील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच आपण या क्षेत्रात यशस्वी झाल्याचे सांगितले.संस्थेच्या या वर्धापनदिन सोहळयाचे औचित्य साधुन रोटरी क्लब सावंतवाडीच्या पहिल्या महिला अध्यक्षा डॉ विनया बाड आणि सातुळी बावळाट ग्रामपंचायत सदस्या योगिता पुराण यांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी रांगोळी आणि पाककला स्पर्धेसह सांस्कृतिक कार्यक्रमांना शालेय विद्यार्थ्यांसह महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद लाभला. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.