मालवण
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मालवणातील पहिल्या महाविद्यालयीन युनिटचा शुभारंभ शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे मनसे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी युनिट अध्यक्ष पदी यतीन माजगावकर व कुमारी मिताली बांबार्डेकर यांची निवड करण्यात आली आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्क अध्यक्ष तसेच मनविसे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य अमोल साळुंखे यांच्या सहमार्गदर्शनाखाली शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मालवणातील पहिल्या महाविद्यालयीन युनिटचा शुभारंभ झाला.
मनविसेचे मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड यांच्या नेतृत्वाखाली मालवण शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या युनिटमध्ये ६० विद्यार्थी- विद्यार्थिनींनी प्रवेश केला. यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड, मनविसे तालुका अध्यक्षा विद्यार्थिनी प्राजक्ता पार्टे, मनसैनिक वैभव माणगावकर तसेच मनविसे उपविभाग अध्यक्ष अभिजीत मेथर विलेपार्ले विधानसभा, महाराष्ट्र सैनिक तुषार जुवेकर आदी उपस्थित होते.