You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या हस्ते डिगस येथील पुष्पसेन ज्ञानपीठ वार्षिक स्नेहसंमेलनाचा शुभारंभ

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते डिगस येथील पुष्पसेन ज्ञानपीठ वार्षिक स्नेहसंमेलनाचा शुभारंभ

*स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण-आ. वैभव नाईक*

 

*विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण*

 

कुडाळ / डिगस:

इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस पुष्पसेन ज्ञानपीठ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिक्षण संस्थेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

आ. वैभव नाईक म्हणाले, स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा गौरव शिक्षण संस्थेकडून केला जातो. नेतृत्वाला वाव मिळतो. नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही. तर व्यवसायिक, शैक्षणिक क्षेत्रातही त्याचा उपयोग होतो. स्पर्धेचे युग आहे.त्यामुळे सक्षमपणे स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. पुष्पसेन सावंत यांनी हि संस्था स्थापन केली. आत त्यांच्या मागे संस्थेचे अध्यक्ष भूपतसेन सावंत यांनी या संस्थेचे स्वरूप वाढवले आहे.उच्च माध्यमिक अकॅडमी, फार्मसी, नर्सिंग आदी कोर्स याठिकाणी सुरु आहेत. यातून अनेक विद्यार्थी घडत आहेत.असे सांगत विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस आ. वैभव नाईक यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भूपतसेन सावंत,जिल्हा परिषद माजी सदस्य अमरसेन सावंत,प्रा.नितीन सावंत,रणजित सावंत, सौ. अनुजा सावंत,सरपंच सौ. पवार, उपसरपंच मनोज पाताडे, सुरभी सावंत,अनिल नाईक, राम भोगळे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा