You are currently viewing गुड फ्रायडे

गुड फ्रायडे

*ज्येष्ठ लेखक कवी बाबू फिलिप्स डिसोजा लिखित गुड फ्रायडे निमित्त अप्रतिम लेख*

*गुड फ्रायडे*

यंदा ७ एप्रिल २०२३ ला गुड फ्रायडे आहे.
ख्रिस्ती धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला दोन हजार वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे. जगात ख्रिस्ती धर्माचे लोक जवळपास ३ अब्ज आहेत. बेथलेहेम इथे येशू ख्रिस्तांचा जन्म झाला. त्यांच्या मातेचे नाव मेरी होते. धर्म पिता जोसेफ होते.
त्यावेळी यहुदी धर्मात अंधश्रध्दांचे अवडंबर होते.
“परमेश्वरा आम्हाला फक्त दोन वेळची भाजी भाकरी दे. कोणत्याही मोहाला आम्हाला बळी पडू नको. अमंगल वाईट गोष्टींपासून नेहमी आमचा बचाव कर मागणी परमेश्वराकडे केली पाहिजे “अशी शिकवण येशू ख्रिस्तांनी दिली.
ख्रिस्ती बायबल आपल्याला शिकवते की येशूचे मूळ प्रेषित पीटर ; जेम्स; जॉन; अँड्र्यू; फिलिप; यहूदा इस्करियोट; मॅथ्यू; थॉमस; जेम्स, अल्फियसचा मुलगा; बार्थोलोम्यू; जुडास थॅडियस; आणि सायमन झेलोट्स होते.

ख्रिस्ती धर्मात मुख्य तीन पंथ आहेत. रोमन कॅथोलिक, इस्टर्न ऑर्थोडॉक्स आणि प्रॉटेस्टंट.
प्रॉटेस्टंट पंथात अजून काही उपपंथ आहेत.

प्रॉटेस्टंट पंथ सुधारणावादी मानला जातो. तो पंथ येशू आणि त्यांच्या शिकवणुकीला मानतो. रोमन कॅथॉलिक पंथ मेरी आणि येशूला मानतो. जुना करार या बायबल ला कॅथोलिक ,तर नवा करार बायबल ला प्रॉटेस्टंट पंथ मानतो.
नव्या करारात येशूने केलेल्या चमत्कारांचे संदर्भ त्यांच्या शिष्यांनी लिहून ठेवले आहेत. त्यांनी जे प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले ते आहेत. ते बुध्दीच्या पलिकडील आहेत.

जेव्हा खाण्यापिण्याचे संकट वाढले तेव्हा त्यांनी पाण्याला द्राक्षांचा वेल आणि द्राक्षरसात बदलले. तसेच येशूने 5 हजार लोकांना 5 भाकरी आणि 2 मासे खायला दिले.(यूहन्ना 6:8-13.)
येशूने अनेक आजारी आणि अशक्त लोकांना बरे केले. त्यांनी अंधत्व, बहिरेपणा, कुष्ठरोग आणि अपस्मार तसेच पांगळेपणा देखील बरा केला होता. (मत्ती 4:23).
एकदा येशू आपल्या शिष्यांसह नावेतून गलील समुद्र पार करत असताना अचानक वादळ वाहू लागले. यामुळे त्यांचे शिष्य घाबरले आणि थरथरू लागले. मग येशूने आपल्या सामर्थ्याने वादळ शांत केले.(मत्ती 14:24-33.)
येशूने अशा लोकांना बरे केले ज्यांना भुते ग्रस्त आहेत असे म्हटले जाई.
येशूने एका विधवेचा तरुण मुलगा आणि एका लहान मुलीचे पुनरुत्थान केले. त्यांनी मित्र लाजरला देखील पुन्हा जिवंत केले होते.(यूहन्ना 11:38-48; 12:9-11.)

बराच काळ ते अज्ञातवासात होते.येरूसलेमला पुन्हा येताना टेम्पल माउंटकडे पाहताना त्यांना दिसले की त्या टेम्पलच्या गाभाऱ्यात बाहेरच्या बाजूस रोमन टॅक्स कलेक्टर बसलेले आहेत, मनी चेंजर्स बसले आहेत आणि तिथे सर्व प्रकारचे व्यवसाय सुरू आहेत. हे बघून येशूंना खूप वाईट वाटले की या पवित्र मंदिरात अशा प्रकारचे काम चालले आहे.त्यांनी या गोष्टींना विरोध केला. राज्यपाल पिलातापुढे तक्रारी करण्यात आल्या. रोमन साम्राज्याच्या अंकित असल्याने येशूंना देहदंडाची शिक्षा सुनावली.
येरूसलेम येथे येशूला वधस्तंभावर खिळून मारले गेले. अवघे ३२ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले.
यहुद्यांचा राजा म्हणून त्यांचा उपहास केला गेला.
त्यांना काटेरी मुकुट घातला गेला.हे” परमेश्वरा ते काय करताहेत हे त्यांना माहीत नाही. त्यांना क्षमा कर. “हे त्यांचे शेवटचे उद्गार होते.
तो दिवस गुड फ्रायडे म्हणून मानला जातो.
तीन दिवसांनी येशू रविवारी पुन्हा जिवंत झाले.त्यांचे पुनरूत्थान झाले.
त्यांना शिष्येने कबरी बाहेर पाहिले. इतर अनेक शिष्यांना, अनुयायांना दर्शन दिले.
येशूंनी जरी भविष्यवाणी केली तरी कधीही स्वतःला देव न मानता देवाचा पुत्र म्हणविले.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लेन्ट म्हणजे ४० दिवसांचा उपवास ख्रिस्ती धर्मीय करतात. राखेचा बुधवार ते इस्टर संडे पर्यंत हे उपवास (रविवार खेरीज)असतात. या कालावधीत एकभुक्त राहणे, मांसाहार वर्ज्य करणे,बायबलमधील वचनांचे चिंतन मनन करणे तसेच श्रध्दाळू भाविक येशूने ४० दिवस भोगलेल्या यातनांचे स्मरण करतात. येशु वरील श्रध्दा यामुळे दृढ होण्यास मदत होते.

(संदर्भ-बायबल, विश्वकोश)
बाबू फिलीप डिसोजा
यमुनानगर निगडी पुणे-४११०४४

 

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 5 =